||शिवराय||
शिवजयंती होऊन गेली
साजरी पण करून झाली
पण शिवराय फक्त फोटोतच
राहिले
पण शिवराय फक्त मुर्तीतच
राहिले
दंग्यासाठी जमले सारे
दंग संपला परत गेले
“जय शिवबा आणि जय जिजाऊ”
ओठातच नुसते विरून गेले
ओठांवरचे शिवराय डोक्यात
कधी जाणार,
डोक्यातले शिवराय मनात कधी
जाणार,
मनातले शिवराय आचरणात कधी
येणार,
याची वाट शिवराय पण पाहत
असतील,
हनुवटीवर हात ठेवून विचार
करत बसले असतील.
ओठातले शिवराय डोक्यात
जेव्हा जातील,
रायगडावरच्या दगडांची सुदधा
फुले होऊन जातील.
डोक्यातले शिवराय मनात
जेव्हा जातील,
तेव्हा समस्त गड-किल्ल्यांना
जाग येईल.
मनातले शिवराय आचरणात
जेव्हा येतील,
तेव्हा माझे शिवराय पुन्हा
जन्म घेतील......
तेव्हा माझे शिवराय पुन्हा
जन्म घेतील.....
Comments