आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस. कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.
मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ?
४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.!
Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार!
Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती टोमॅटोची भाजी, अश्या च्या आवडीची पुरणपोळी ह्या सगळ्याची चव जगात कुठल्याच hotel मध्ये मिळणार नाही. आणि ५:३० मिनीटांचा आमचा जेवायचा record कोणीच मोडु शकणार नाही. डबा खाऊन झाल्यावर हनुमान ला जाऊन चहा पिण्याचा योग बहुतेक जमणारच नाही. admin मध्ये exam fee ची वरदळ, आणि cashier जवळची गर्दी तशीच असेल पण त्या गर्दीत आपण नसू. बदाम चौकात त्या ground च्या पायर्यांवर बसल्यावर कदाचित ती हिरवळ ही दिसणार नाही. वर्गात, आणि college मध्ये तयार झालेले crush क्वचितच दिसतील.
लिहिता लिहिता पण डोळ्यात पाणी आल, ४ वर्ष ज्या college ला शिव्या दिल्या , ते सोडून जाताना एवढा मोठा आवंढा का येतो ? का डोळे भरून येतात? मित्र, मैत्रीणी आणि शिक्षकांना गमवण्याच्या भितीने का उर भरून येतो?
Engineering करता करता इतका emotional कधी होतो कळतही नाही. म्हणूनच म्हणतात ना,
"FE ला छोटे असतो, SE ला मोठे झाल्यासारखे वाटत, TE तर SE वर दादागिरी करण्यात निघून जाते, पण BE आयुष्याला वळण देउन जाते.."
काही जण campus मध्ये place होतात, काहीजण exam crack करून Mtech/MBA करायला जातात, प्रत्येकाची वाट वेगळी होते, नाती हो हो म्हणता दुरावतात. पण काहीजण असेच मधल्या मधे अडकतात.
मागच्या वर्षी send off ला seniors एवढे का रडले हे आता समजतय, एक वेगळीच जाणिव होते, ह्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवायला एकट्यालाच धडपडायच आहे. College मध्ये सावरायला खुप जण असतात पण बाहेर सावरायच पण आपण च असत आणि पडायच पण आपण च असत.
बदल प्रत्येकाच्या आयुष्यात होतात, college संपणे हा पण एक बदलच आहे पण हा बदल आपण थांबवू शकत नाही, याची खंत मनात कायम राहते.
मित्रांच्यातल अंतर वाढत हे नक्की असत पण सोबत नाही सुटत, मित्रांच्यातला तो गुप्त करार कायम पक्का असतो.. म्हणून प्रत्येकाला हेच सांगतो की college संपल म्हणजे आयुष्य संपत नाही, पुन्हा कुठेतरी भेटू आयुष्यातली सुखदुख परत एकमेकांशी वाटू. पण सोबत कायम राहू...!
हा blog वाचून खूप जण मला ओरडणार आहेत पण कधीतरी भावनेच्या भरात खूप खूप चांगल्या गोष्टी घडून जातात!

Comments
Heart touching.
Thank for sharing this.keep it up