सुख म्हणजे नक्की काय हो?
खूप सारी श्रीमंती? मोठी गाडी? भरपूर पगार? की
मग आपली सुंदर बायको?
नक्की काय?
मनातल्या मनात सुखाचे मनोरे बांधायचे कितीही
प्रयत्न केले तरी प्रत्यक्षातल सुख काही वेगळच असत ना!
एखाद्या दिवशी उशिरा उठून आलेला आळस झटकून न
देता तसेच उठून (आवरून) तुम्ही गाडी ला किक मारून officeला जाता आणि तिकडे
गेल्यावर कळत की आपला team leader तर आज नाही आलेला, आणि त्यानंतर जो
निवांत दिवस तुम्ही घालवता ना तेच हे जे काही असत ते “सुख”!
खूप प्रयत्नानंतर, अगदी
डोक्याच दही करून तुम्ही एखादा code करता आणि तो successfully compile होतो,
आणि त्यानंतर जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर खुलून येत ना तेच हे सुख!
अहो एवढ कशाला, तुमची
गाडी, जी कधीही एका किक मध्ये चालू होत नाही, आणि office मधून घरी जाताना बरोबर
वेळेत एकाच दणक्यात ती स्टार्ट होते ना, तेव्हा जो आनंद त्या गाडीच्या vibration सोबत चढत असतो ना त्याला म्हणतात सुख!
आयुष्याच्या नव्या टप्प्यावर
आतुरतेने ज्याची आपण वाट बघत असतो अश्या पगाराचा text येतो आणि तेव्हा तो आलेला मेसेज
आपण आपल्या वडीलांना दाखवतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो नकळत येणारा अभिमान
असतो ना ते असत सुख!
आजूबाजूलाच असत पण शोधाव लागत म्हणून आपल्या
सापडत नाही! जे आभासी आहे ते प्रत्यक्षात आपल्याला तेवढ समाधान देईलच कशावरून?
मनात शंका येतेच ना की आज आपण 40,000 चा मोबाईल घेतोय, उद्या त्याच नवीन मोडेल येईल मग तेव्हा हे जुना मॉडेल
आपल्याला तेवढाच आनंद देईल?
एखाद्या होस्टेल वरती
राहणाऱ्या त्या विद्यार्थ्याला विचारा, तो सांगेल खर सुख कशात असत! आई च्या हातून
बनलेल्या कारल्याच्या भाजी पेक्षा होस्टेल ची खीर कधीच चविष्ठ असू शकत नाही!
कधी सुखी माणूस
बघितलाय? तो सुखी आहे हे तुम्ही कस ओळखता? त्याचा हसरा चेहरा बघून? की त्याच्या
डोळ्यातली चमक बघून?
शेवटी काय तर, सुख ही
कोणती वस्तू नाही की जी तुम्ही मिळवू शकाल किंवा कोणीतरी तुम्हाला आणून देईल, सुख
हा एक भास आहे, सुखी असण ही एक भावना आहे!
Because it
is something, you can only pursue!
Comments