Skip to main content

ग्रहण

     आज उशीर झाला निघायला! ९ वाजून गेल्यावर आगरा च्या flyover वरच traffic म्हणजे डोक्याला ताप!!
त्यात rent वर घेतलेल्या bike ने जाणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!
हेल्मेट मधून केसांना आलेला घाम, आणि रणरणत बेंगलोर च ऊन! ४ चाकी गाड्यांच्या मधून मधून वाट
काढत काढत पुढे जायची लढाई सगळेच करतात आणि मी त्यात नवीन ह्या सगळ्या उद्योगाला, त्यामुळे
जरा अवघड जात होत पुढ सरकण. शेवटी कसातरी flyover संपला आणि मी एका BMTC बस च्या आडाने पुढे सरकलो. 
     Traffic कितीही असल तरी आजूबाजूला बघायची सवय कोणाची जाते??
मनातल्या मनात अरिजीत सिंग च गाण गुणगुणत इकडे तिकडे नजर फिरवत होतोच (नेहमीप्रमाणे)
तेवढ्यात एक activa कट मारून गेली, वर पाहतो तर मुलगी!
मुलीने आपल्याला कट मारला हे बघून माग बसलेल्या मित्राने ओरडून सांगितल; 
हिला overtake करायचच;
मग काय मी पण जोशात गाडी चा speed वाढवला आणि एक एक गाडी माग सारत तीच्या गाडीमागे
येउन पोचलो, आता अगदीच सोप होत, ती आणि मी थोडी जागा मिळाली की मी गाडी घुसवणार आणि
पुढे जाणार. मी तिला overtake करायला लागलो, थोड accelerate केल, आणि आता पुढे जाणार तेवढ्यात तीने मागे वळून पाहील, तीचा उद्देश मागून कोणी येत तर नाही ना असा होता पण तीची माझी
नजरानजर झाली आणि तीने जणू नजरेनेच सांगितल की;अजून पुढे आलास तर याद राख; मी ब्रेक दाबला आणि गाडी तीच्या मागूनच न्यायला लागलो. 
मागे बसलेला मित्र माझ्यावर प्रचंड खवळलेला पण काय करणार तीच्या त्या नजरेच्या ईशार्याने मला घायाळ केलेल. 
तीची नजरच इतकी दाहक होती तर किती सुंदर असेल ती दिसायला हा विचार चटकन मनात येउन गेला आणि मग तिचा चेहरा पाहण्यासाठी धडपड होउ लागली. आधी विचार केला की overtake करूया आणि मग काय दिसेलच की जाता जाता पण तस काही झालच नाही, तीने पुढे जायच्या सगळ्याच वाटा जणू रोखून धरलेल्या.
     अस वाटत होत की आता दिसेल, मग दिसेल पण दिसायलाच तयार नाही. इकडे traffic कमी कमी होत चाललेल, भीती ही की गर्दी कमी झाली आणि ती दुसरीकडे वळली तर
दिसणार कशी? कासावीसच झालेलो म्हणा हव तर! 
     मी पण मग थोड सावरून गाडी शेवटी तीच्या पुढे घेउन गेलो, तिच्या कडे माग वळून पाहणार तेवढ्यात
तीच्या आणि माझ्या मध्ये अख्खी BMTC आली, एकाच वेळी ४-५ busses मध्ये घुसल्या,
नशीबाला दोष देउन मी माझ्या वाटेने निघून आलो.
सुर्याला आणि चंद्राला ग्रहण लागत ना, तेव्हा आपल्याला ना चंद्र दिसतो ना सुर्य, तसच काहीस झाल
ना हे, तीला ग्रहण लागल ते पण busच!
Atleast ग्रहण संपल्यावर सुर्याचा लख्ख प्रकाश पडतो पण इथे ग्रहण लागल्यावर हा चंद्र मात्र मागच्या
मागे गायब झाला!
     जस जस office जवळ आल तस माझी अस्वस्थता कमी झाली आणि मग आज काम काय काय असणार ह्या विचारात मी गाडी पार्किंग मधे नेली. पार्क केली आणि हेल्मेट काढत होतो तर समोर काय , तीच मुलगी, आणि तीही तीच हेल्मेट काढत होती.
     माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, तीने हेल्मेट काढल आणि ती हेल्मेट ठेवून वरती
बघणार एवढ्यात, "Where is your parking sticker sir?" अस विचारत त्या guard ने माझ्याकडे record book दिली! 
     मी त्याच्या आडून पुन्हा त्याच पराभवाच्या भावनेने मान खाली घातली!

काही जणाना रोज सुर्याचा प्रकाश मिळतो आणि काहीजण(आमच्यासारखे) ग्रहणाच्या दिवशीच डोळे
उघडतात!!!😂😆😜





Comments

Anonymous said…
Kharach khup sundar asa traffic prem... Helmet madhun najrela milnari to najar... Punha bhetu ki nhi he mahiti nasatana te kahi kshanansathi premat padne...Ti tya vyaktila pahaychi hurhur... Ani te tiche traffic madhe haravane... shevatchya kshani punha bhetne n Dole band karun ughadtach tiche punha haravne... Pratyekachya ayushyatle te ek(or more ;p ) grahan...

Kharach khup sundar story vyakt keli ahes...
Thank you!! Keep Reading! Keep motivating!!! #Anonymous

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media