माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या.
आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला.
आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्यावर चढलो. फक्त एक क्षण, आणि डोळ्यापुढे काजवे चमकावेत तसा चक्कर येउन खाली बसलो.
" माझ गाव " कोणीच कधीच अस स्वप्नात देखील पाहील नसेल, मी ज्या शाळेत गेलेलो ती शाळा देखील पाणी साचून, साचून नव्हे तर पाण्यात बुडून बंद पडलेली.
आणि उतारावरची घर पत्त्याचा बंगला पडावा तशी कोलमडून पडलेली.
आत्तापर्यंत "मी" आणि "माझ" करण्यात आयुष्य घालवल , आता ही परिस्थिती बघून अहंकार पार बुडाला.
पुढच्या बोटीची वाट मी अशीच बघावी म्हणून घरात सापडलेली एकच छत्री उघडून पत्र्यावरच बसलो.
पहीला दिवस कसा पार पडला कळल देखील नाही पण येणारा दिवस अंत बघणारा असेल हे निश्चित होत.
विचार चालूच होते, तेवढ्यात लांब वर काही बॅटर्यांचा प्रकाश दिसला, मी देखील माझ्या फोन ची बॅटरी ऑन केली, शिंद्यांच्या ४ मजली बंगल्यामध्ये १०-१२ जण होते (अंदाजे) आणि ते देखील कदाचित त्याच बोटीची वाट बघत होते.
त्याना बघता क्षणी थोड निवांत वाटल. रात्री उशीरा पावसाचा जोर कमी झाला आणि मी पुन्हा पत्र्यावर पुन्हा चढलो. क्षणासाठी तो अंगाला झोंबणारा, थैमान घालणारा वारा अल्हाददायक वाटायला लागला. तसाच खाली बसलो.
"काय मिळवल मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात? पैसे? ते तर आता कष्ट केले नाहीत तरी मिळतात मग काय? गावात respect ? ती तर वाडवडीलानी कमवलेली, मग माझ काय?
स्वतःच अस मी काय केल?
जे काही होत नव्हत ते सगळच कृष्णा घेउनच चालली आता. अगदी पत्र्याला टेकायला आलेल्या पुराच्या त्या लाटा, त्यात अहंकार वाहून गेला आणि मी साफ झालो.
थोड हलक वाटल आणि पुराशी दोन हात करायला अजुन जोर चढला.
खर सांगू का? आपल्याला एवढ्या लवकर कोणतीही मदत मिळणार नाही ही भावनाच खूप भयानक असते.
पण परिस्थितीशी जुळवून घ्याव लागत आणि लढाव लागतच.
NDRF च्या Team ७ दिवसांनी बोटी घेऊन आल्या, तोपर्यंत मी एकटा तिथे परिस्थितीशी आणि माझ्या मनस्थितीशी लढत होतो!
बाहेर आल्याबरोबर समोर दिसणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच हसू पाहून ताकत वाढतच गेली.
रक्तात लढायची सवय भिनली असल्याने हार मानायला मन तयारच होत नाही. कोणी मदतीला आहे किंवा नाही हे न बघता स्वतः स्वतःची मदत करून सावरून इतरांनाही सावरायची ताकत ह्या सांगली आणि कोल्हापूरच्या मातीत आहे आणि ती आमच्या रक्तात आहे!

Comments