अडकलेल्या जीवाला मोकळी वाट हवी!
खर सांगतो, रात्री झोप मात्र शांत हवी.
दिवसभराची ओढाताण आणि व्याप सगळा कामाचा,
मनातली घालमेल आणि डोंगर समोर कष्टाचा,
गुलामीच्या दिवसापेक्षा, स्वातंत्र्याची रात्र हवी!
निरभ्र आकाशही हवे, आणि लुकलुकत्या चांदण्याही,
चांदण्यांच्या अंधुक प्रकाशातही,
पाहण्याची आस हवी!
स्वप्ने हवी खरी खरी, स्वप्नाचीच रात्र हवी,
स्वप्ने पाहता पाहता, झोप मात्र पुर्ण हवी!
Comments