निळ्या शार आकाशाला जसे ढंगाचे चित्र गोंदले,
हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी मेघ आक्रमिले!
कोण सांगेल का झाले, अनोळखीचें आले वारे,
ऋतुचक्र बदलून, पार विस्कटून गेले सारे.
स्वभाव आहे पावसाचा, कोसळणे सतत आहे,
माझ्या मनीचे, गूज सारे, गुंतून आज गेले आहे.
काल होता, स्वल्प काळी, माझ्या मनीचा ऋतु हा ही,
बदलून गेला थंडवारा, दमट वादळे पाहता ही.
शांत कालच्या मंद लाटा, आज तुफानी साथ आहे,
तू सांग, तुझ्या मनीची, कोणती वादळवाट आहे.
Comments