Skip to main content

Posts

Time to be happy is now!

It’s hard when you stop understanding your own feelings! People expect you to show some act of maturity and you fail them. People expect you to be sensible at every moment and you fail in that too. When you have a crush on someone and the person comes to talk to you and after a time you realize the person doesn’t feel the same way. Sometimes you love someone for a very long time and after that ‘long time,’ you realize that you don’t have enough courage to say it to that someone. Sometimes you are good at something (really good) and still make mistakes while doing it, of course not purposely but it happens. You meet people every day, now and then and you call them friends but sometimes they are just colleagues who are acting friendly (Over friendly sometimes) But some of them can be real friends (even if they don’t show that) You don’t understand the difference between either. Sometimes you expect people to behave how you like them to behave but you know (from inside) that you can’t co...

आता परत ते नाही!

आता परत ते नाही! सकाळी सकाळी आई उठवायची, नाही उठलो तर धपाटे घालायची, ओढत ओढत आंघोळीला पाठवायची, आणि धुतलेले कपडे घालून hero सारखा भांग पाडायची! तेव्हाच काय ती मजा होती, आता ते परत नाही! शाळेत सगळे मित्र भेटायचे, कालचे भांडण आज विसरायचे, दुपारी सगळे एकमेकंच्यातलच खायचे, सरांच्या छड्या पण सगळेच घ्यायचे, पण शाळासुटेपर्यंत सगळेच वाऱ्यावर विरून जायचे! खरा आनंद त्यातच होता, आता ते परत नाही! शनिवारी गल्लीत कलकलाट असायचा, विट्टीदांडू, विष-अमृत, लपाछपीचा डाव हमखास जमायचा, bat वाला आलाच तर क्रिकेटदेखील खेळायचा, सगळेच हसत खेळत होते, रुसवा कोणाचाच नसायचा! सगळ तेव्हाच मस्त वाटायच आता ते परत नाही! TV वर शक्तीमान ची वेळ कधीच नाही चुकायची, मोगली ची संधी कधीच नाही हुकायची, पाठीवर शाल गुंडाळून सगळी कार्टी हिंडायची, सगळ व्हायच पण रडू कोणालाच यायच नाही! तेव्हाच खर हास्य होत, आता ते परत नाही! आता सकाळी लवकर उठतो, snooz ४ वेळा तरी दाबूनच ! नाष्टा केला तर होतो नाही तर तो पण नाहीच! corporate वाले मित्र झालेत खूप, पण दोस्त कोणीच नाही! तेव्हाच आयुष्य होत, आता ते परत नाही! ...

शाळेतले शिक्षक

शाळा सुटायला आली की दप्तराकडे जाणारे हात, त्यात भरल्या जाणारी वह्या आणि पुस्तकांची गर्दी आणि सगळ्यांनी दप्तर भरलेले बघून सरानी म्हणावे की "मी अजून १५ मिनिटे शिकवणार आहे" किती राग यायचा ना? किती शिव्या दिल्या असतील त्या सरांना! पहिली पासून दहावी पर्यंत अशा घटना जवळपास आठवड्यातून ३-४ वेळा तर घडायच्याच. शेवटचा तास अभ्यासिकेसाठी राखून ठेवायला शाळेने सुरु केल तेव्हा पासून हा दुसरा त्रास थोडा कमी झाला. असे अनेक प्रसंग असतात, शाळेत वर्गात घडलेले, ग्राउंडवर खेळताना धडपडलेले, गृहपाठाची वही घरी विसरून आलेले आणि कधी परिपाठाच्या वेळी शाळेसमोर थाटात उभे असलेले पण ह्या सगळ्यात शिक्षक ही एक व्यक्ती constant असते. गणित शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे, अगदी drawing शिकवणारे सुद्धा सगळे एकच! त्यांची रूप वेगवेगळी. जस देवाच असत ना तसच ! प्रत्येकाचा विषय वेगळा असतो पण ध्येय एकच असत, "मुलाला घासून पुसून लक्ख करून ह्या जगात वावरायला तयार करणे"  फक्त ह्या देवासाठी कोणताच उपवास किंवा पूजा करावी लागायची नाही कारण शिक्षकाकडे काही मागण्याची गरज च नव्हती, जे असायच ते त्यांनी खुल्या हाताने आण...

"महा"पूर

माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या. आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला. आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्याव...

Pleasure of Writing!

Actually it's really that simple, you gotta pick the pen and and write down what's in your mind! Yes! All can do it. It's nothing extraordinary in it. They are just thoughts poured on paper. How to be a good writer? Just bite the words, ingredients makes the food delicious, recipe is just a process. You gotta find some good words and mix your thoughts with it and seriously write it down. Write, write and dont stop writing until your mind becomes empty. I tried it and it works. Before writing something you never experienced, write something which was happened with you, happening with you. You are walking down a street, you see a guy with no shoes, there comes some sympathy for him and you start thinking about how tough his life is, ; Bammm! You got your story there! Yeah I know finding right words isn't that easy but it's not difficult! You have written a thousands of essays in schools, from where you got those words? Some people will tell you, learn gra...

Life's "little" Secret

I never wanted to be something extra! I always dreamed to be an engineer! Even when I couldn't spell the word, for everyone who asked me this question, answer was engineer! And then one day, in school my English teacher asked me, how do you spell Engineer? And I kept mum! She shouted at me, and that hit me hard, I started to search for word "Engineer" But as I entered in the phase of being an engineer, I thought I never should've chosen engineering as a career. At that point of life, I already started to write and became quite popular in class 😜 It was always special being called writer but deep down I always knew, even if I chose to write, I cannot pursue it for a long time. And the same happened, I got placed into a Service based company as many of us in that phase do and started working as a trainee (Labour). And what people might have thought of me becoming something extra, that extra was getting supressed.  These was one of the hardest times when I ...

Work Hour Crisis

रात्री १२ वाजता Office मधून निघाल्यानंतर मनात एक प्रचंड काळोख निर्माण होतो, लख्ख उजेडातून मंद प्रकाशाच्या खोलीत अचानक गेल्यावर जस आपल्याला काहीच दिसत नाही ना अगदी तसा! आपण का करतोय एवढ काम? आणि काय मिळवतोय एवढ काम करून? पगार? पण पगार तर ९ तासाचा मिळतो! १४ तासाचा नाही !!! Gate मधून बाहेर गाडी पडल्यावर एवढ्या मध्यरात्री समोर असलेल traffic दिसल आणि मनातल्या अंधारात एक छोटी मिणमीणती पणती असल्याचा भास झाला... मी एकटाच नव्हतो एवढ्या रात्री घरी जाणारा! माझ्यासारखे अनेक होते की जे एवढ्या रात्री आपल दिवसाच काम संपवून घरी जात होते! मग प्रश्न पडला, ते बिचारे आहेत की मी? का दोघेही समदु:खी? खरच गरज असते का एवढ काम करायची? कॉलेज मध्ये असताना संध्याकाळी घरी जायचो, ती संध्याकाळ आता कुठे गेली? हरवली का ती? मनात फक्त हेच विचार चालू असतात आणि Flat वर पोचेपर्यंत मी पक्क ठरवतो की उद्या लवकर बाहेर पडायच, आणि संंध्याकाळी त्या रसगंगा मध्ये जाउन चहा प्यायचा! लवकर यायच तर मग लवकर जायला पाहीजे, लवकर उठलो, आवरून गेलो पण तुम्हाला माहीती आहे का? तो एक लूप आहे, रोज तिथे गेल्यावर brainwash होतोच आणि पुन्हा...

Social Media