पाऊस...
पाऊस म्हणजे पाणी...
पाऊस म्हणजे गाणी...
पाऊस म्हणजे वारा...
थंड थंड गारा....
हिरव्यागार मखमालीवर थेंबांचा मारा...
पाऊस म्हणजे हिरवळ...
पाऊस म्हणजे ओलसर...
पाऊस म्हणजे काळ्या काळ्या ढगांची गर्दी ती वेडसर....
पाऊस कायम हवा-हवासा...
कधी रिमझिम, कधी रिपरिप...
पाऊस कधीतरी नकोसा...
प्रेमाची गीते पाऊस...
म्हातार्यांचा अनुभवी पाऊस...
कोणाचीतरी भिजण्याची हौस...
पाऊस एकदम निराळा...
- शार्दूल नरेंद्र मंदृपकर...
Comments