..
खूप अतूट नात आहे तुमच आणि माझ... ह्या ब्लॉग मुळ
आपण भेटतो म्हणजे हा ब्लॉग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे न?
लेखकाच्या आकांक्षेचा आणि महत्वाकांक्षेचा
साक्षीदार असतो तो म्हणजे त्याने लिहीलेल्या लेखांचा, पुस्तकांचा वाचक...आणि
वाचकाच्या भावना समजून उमजून त्याच्या मनात नवचैतन्य आणि आनंदाची नवीन भावना
निर्माण करतो तो असतो लेखक.. म्हणजे बघा वाचक असेल तर लेखक जगेल आणि लेखक नसेल तर
वाचकाच्या जीवनाचा अर्थच उरणार नाही.
हल्लीच्या काळात कोणी पुस्तक वाचत नाही म्हणून
आपण कीतीही ओरड केली तरी पुस्तक वाचणार्यांची संख्या कमी होत नाही. मला तर असा
वातातात्य की जे पुस्तक वाचताच नाहेत आणि ज्यांना वाटत की इतरांनीही ते वाचू नये
ते असला आगाऊपणा करत असतात आणि आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या नवलेखकांचे लेख वाचणाऱ्या
वाचकांचे मन परावृत्त करतात.... तरीही असंख्य असे वाचक असतात जे आम्हाला अविरत
प्रेरणा देत असतात. आणि भविष्यात सुद्धा देत राहतील...
मागच्याच महिन्यामध्ये माझ्या ह्या ब्लॉग
चे १००० views कम्प्लीट झाले, याचा मला आनंद तर आहेच पण ह्या मुळे मिळालेल्या प्रेरणेने मी
अधिक लेख तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकेन त्याचा उत्साह मला जास्त आहे. सहस्रपूर्तीच्या
निमित्ताने तुमच्याशी थोडा वेगळा संवाद साधावासा वाटला त्यामुये हे थोडेसे वेगळे
काहीतरी....
धन्यवाद...
Shardul Narendra Mandrupkar |
Comments