आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर ...