Skip to main content

Posts

आपली पहिली भेट

आठवते का आपली पहिली भेट? प्रथम तुज पाहता, काय सांगू काय झाले, तुझ्या नजरेने काळीज माझे घायाळ केले. नक्की प्रेम म्हणजे काय हे कळण्या आधीच प्रेमात पडलो, तुझ्या ओठांत मिसळत येणाऱ्या शब्दात मी अडकलो. तुला पाहताना जीव वेडावून गेला,  तुझे बोल ऐकताना कान तृप्त झाला! पाहता क्षणी वाटले की हीच ती, माझी life Partner, हिच्यासोबत असेल संसार माझा, कोणालाच नाही ही सर. भेटताना तुला वाटले आवडेन का मी तुला? तुझ्या आयुष्यात मिळेल का जागा मला? पण, तू होकार दिलास आणि सगळच खर झालं. सुख, सुख म्हणजे काय नक्की हे मला दिसलं. तू आणि मी एकच झालो,  तुझ्यासोबत आयुष्याचा सोबती मी झालो. आठवते का आपली पहिली भेट? तीच आठवत आठवत आत्ता, तुझ्यासाठी केलेली, तुझी च ही कविता सुचली.

पाऊस मला म्हणाला एकदा!

पाऊस मला खुणावतोय, म्हणतोय बघ मी कसा आहे, थांबतो का कोणासाठी, मला हवं तस मला हवं तिथं माझा मी पडून जातो. मला नाही बंधन कोणतं, अगदी धरणं फोडू शकतो, पाऊस आहे मी, वाऱ्यासोबत तांडव करू शकतो. मग उडते तारांबळ सबंध पृथ्वी लोकाची, घर, महाल किंवा तुमची फॅक्टरी पर्वाच नाही कशाची. रौद्र रूप पावसाचे पाहून मीच थोडा बावरा झालो, विषय थोडा गंभीर वाटला म्हणून थोडा थांबलो. अरे हो हो म्हणालो, माहीत आहे तुझा प्रताप, असाच हैराण करून होतोस मधूनच कटाप. बघ थोडी माझीही स्थिती तू जाणून घे, मन दुबळे असेल तरी भाव माझे समजुन घे, नाही बाबा माणसाला अस मनसोक्त उडता येत, कितीही झेपावल तरी नाही तसं सांभाळता येत. जबाबदारीचे दोर असतात पायात बांधलेले, किती ही म्हणलं तरी त्याचे पाश असतात मनाला कसलेले. तुझ सगळं मान्य आहे, तूच निसर्गाचा राजा, आम्ही शुल्लक मानव जीव, आमची हीच सजा!

काय बोलावे

 काय बोलावे मला कळतच नाही, की ऐकावे नुसते ते सुचतच नाही.. अवघे सारे दुःख माझे व्यक्त कधी होत नाही, परक्याच्या ह्या वेदेनेचे अर्थच मुळी समजत नाही... विषय गंभीर तरी बेजार सर्व काही सुन्न सुन्न, उमजत नाही तसं आता बोलावे की ऐकावे हे सुचतच नाही... कोण मजला पाहिले अन बोलले की त्रस्त आहे, माहिती रे त्रस्त मी तरी उपाय कोणी सुचवला एकही नाही! पाहिजे ते पाहिले प्रत्येकाने, दुवा मी जोडवला नाही, पाहिले पण योग्य तो पाठिंबा मज लाभला नाही...! हा की तो, मी पाहूनी थकलो आता, हा की तो, की मी ह्यातच अडकलो आता, संपले नाही जीवन तरी अडखळला प्राण माझा... हाच आहे का प्रसंग, संपते अनंत इथे नाही?

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय? फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी? पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.? श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस? कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव? खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते. व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”. छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो. निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की! पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात. त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणार...

शांत झोप

अडकलेल्या जीवाला मोकळी वाट हवी! खर सांगतो, रात्री झोप मात्र शांत हवी.  दिवसभराची ओढाताण आणि व्याप सगळा कामाचा, मनातली घालमेल आणि डोंगर समोर कष्टाचा, गुलामीच्या दिवसापेक्षा, स्वातंत्र्याची रात्र हवी!  निरभ्र आकाशही हवे, आणि लुकलुकत्या चांदण्याही, चांदण्यांच्या अंधुक प्रकाशातही,  पाहण्याची आस हवी!  स्वप्ने हवी खरी खरी, स्वप्नाचीच रात्र हवी, स्वप्ने पाहता पाहता, झोप मात्र पुर्ण हवी!

Just Keep the Ball on Table

One fine evening, I was playing table tennis with a couple of my friends. Since I had played and won a couple of matches last weekend, I thought now I could do some hand movements and achieve some spinning effect. As soon as I tried spinning, I started to lose game after game. One of my friend who was watching us came forward and suggested I play my simple game. But I was super confident in my game, and I didn't stop. Finally, he shouted at me, "Just keep the ball on the table!" Suddenly I had a quick thought to myself, and I took his shouting very seriously. And surprisingly I was winning the game. I won all the games after that. That night, till I went to sleep, that sentence was just not leaving my mind. 'Keep the ball on the table.' I was thinking, "How these simple things in life can have such deep meaning." Of course, unknowingly he told me that however life might treat you if it is not happening as you've expected, we should just have to go wi...

The Corporate Day 1

 “The city of lakes!” “The city of opportunities” “The city where I will start my career” These and some more like these, the first sentences came out of my mouth when my feet landed on the soil of this city. ‘Bengaluru’. At first it encourages you, motivates you to do courageous stupid things and then it just waits until you make yourself comfortable in the atmosphere. Around 700 Kms from home, accessing the freedom you have not experienced before, and the decisions which you have to take for yourselves, it all seems so fascinating. But once you settle down in the corporate world, it starts to eat you. First, it eats your personal space, then it starts to run through your blood. And if you are so unlucky that, you are in Bengaluru when the pandemic started? Then please be careful it will soon enter your mind. Away from home, when you miss the food, the air, the water, and even the atmosphere where you can claim that the town/city/village belongs to you, and they reje...

Social Media