Skip to main content

Posts

ओळख

माझ्या उभ्या आयुष्यात कधी लेखन करेन असा वाटल नव्हत. म्हणजे लेखन भरपूर केलय, पण ते फक्त शाळेतच. शाळेच्या बाहेर पहिल्यांदा लिहील ते कॉलेज च्या वार्षिक नियतकालिकासाठी. त्या लेखनामुळे कौतुक झाल, मग ठरवल कि स्वतःचा ब्लॉग लिहायचा. सुरुवातीला नुसत ठरवलं पण कृती कोणतीच केली नाही नुसताच विचार करत राहिलो. अगदी भारताच्या संसंदेसारख म्हणजे एखाद्या विधेयकावर विचार करत बसायचं आणि जेव्हा वेळ निघू जाईल तेव्हा त्याला मान्यता द्यायची. म्हणजे मी खूपच उशिरा लिहितोय असा नाही पण माझ्या मते खूप लवकर लिहितोय असाही नाही. आधी तर ब्लॉग लिहायचा कसा ते सुद्धा मला माहीत नव्हतं मग google ची मदत घेऊन ते सुद्धा शिकलो. आणी तिसर्या सत्राच्या सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कायमच काय लिहायचं हे सुचत नाही आणि मग सुरुवात केली की आपोआप सुचायला सुरुवात होते. आता हेच बघा ना.... आज लिहायला सुरुवात केली तेव्हा काय लिहायचं हे अजिबात माहीत नव्हत पण मग काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मग आता एक मोठा परिच्छेद तयार झालाय. सुरुवातीला ह्या आजच्या विषयाला दिलेल्या नावाबद्दल थोडा बोलूया...  “ओळख” थोडा उशीर झाल...

An empty DRAFT

आज खूप दिवसांनी ब्लॉग उघडला.  settings चेक करत असताना एक ड्राफ्ट सापडला. उत्सुकतेने तो उघडून बघितला तर तो empty  सापडला. हो मोकळा सापडला. मी पण चकीत झालो. पण पुन्हा त्याच ब्लॉग वर लिहायला लागलो. उगाचच मनात विचार आला, ह्या मोकळ्या ड्राफ्ट सारखे बरेच ड्राफ्ट आपल्या खर्या आयुष्यात पण असतात. काहीवेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते माहीत असतात पण आपल्याला ते नको असतात म्हणून आपण त्यांना आपल्या आयुष्यात सामावून घेत नाही. पण काही लोक ह्याच मोकळ्या ड्राफ्ट चा वापर करून खूप मोठे होतात. आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या गोष्टींना थोडेसे जरी गोंजारले तरी त्या आपल्याला खूप मोठ बनवून जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असा मोकळा ड्राफ्ट. काही जन त्याला कायमच डीलीट करतात आणि काही जण माझ्यासारखे त्याच्यावर मजकूर लिहून तो ड्राफ्ट सजवून टाकतात. खर सांगू अजून मला पण माझ्या आयुष्यात सापडला नाही असा मोकळा ड्राफ्ट, कदाचित माझ्या समोरच असेल आणि मला काळात नसेल, पण जेव्हा तो कळेल तेव्हा तो मोकळा ड्राफ्ट शब्दांनी, कष्टानी, आणि माझ्या कर्तबगारी ने सजवून टाकल्याशिवाय मी थांबणार न...
   माणसाच्या भावना ह्या कायम निर्गुण असतात, निराकार असतात पण त्याच भावनांमध्ये दडलेला असतो त्या व्यक्ती चा स्वभाव. भावना ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि त्या व्यक्त करण्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात. भावनांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. आपोआप व्यक्त होणाऱ्या नैसर्गिक क्रियेला सुद्धा एक नाव देऊन त्याचे सुद्धा प्रकार आपणच पाडलेले आहेत. प्रेम, राग, लोभ, दुःख, आनंद, समाधान अश्या वेगवेगळ्या प्रकारात भावनेचा उल्लेख केला जातो. आपल्या सभोवताली राहणाऱ्या, फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करायच्या तऱ्हा निरनिराळ्या आणि त्या भावनांचा उलगडा करणारे त्या व्यक्तीचे शब्द सुद्धा निराळे.          आता बघा हा, “प्रेम” व्यक्त करायचे नानाविविध प्रकार आपल्या बघायला मिळतात. सिनेमा मध्ये वेगळा असतो, एखाद्या तरुणाने अनोळखी मुलीसाठी केलेला वेगळा असतो, आपल्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने आपल्याच वर्गातल्या मुलीला/मुलाला वेगळा असतो. हे सगळा असूनही प्रेम हि भावना मात्र एकच असते. कोणीतरी जमिनीवर गुढघे टेकून व्यक्त करतो, कोणी पत्र पा...

भारत कधी कधी माझा देश आहे.

भारत हा माझा देश आहे... भारत खरच माझा देश आहे ? हो, भारत माझाच देश आहे. १ली ते १०वी रोज शाळेत जी प्रतिज्ञा म्हणतो, त्याची सुरुवात हीच असते की भारत माझा देश आहे... पण आता ते वाक्य थोडासा बदलायला पाहिजे... भारत कधी कधी माझा देश आहे. बरोबर, मी भारतातच राहतो पण मग भारत हा कधी कधी माझा देश कसा काय ? ह्याच उत्तर खूपच साध आहे, आपल्या आजू बाजूला च आहे ह्याच उत्तर. कालच १५ ऑगस्ट होऊन गेला... कालच्या दिवशी तर भारत हा हमखास माझाच असतो आणि ह्या देशातला प्रत्येक “मी” भारताच गुणगान गात असतो. परंतू १६ ऑगस्ट पासून पुन्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात आणि पुन्हा भारत परका होतो. रोजच्या जीवनात कोणीही त्याचे (आपल्याच देशाचे) गुणगान करत नाही. फक्त त्याला शिव्याच मिळतात... “कसले हे रस्ते? रस्ते नव्हे खड्डेच... लोड शेडींग ची बोंब... पिण्याच्या पाण्याची ओरड... भ्रष्टाचाराचा भस्मासुर...” भारतातल्या प्रत्येक गावातून रोज आपल्याला हे असे तक्रारींचे सूर रोज नक्कीच न चुकता ऐकू येतात...तक्रारी तर असंख्य असतात पण त्या सोडवण्यात कोणाला रस नसतो... आपण प्रतिज्ञेत म्हणतो की भारत माझा देश ...

शिवराय

||शिवराय|| शिवजयंती होऊन गेली साजरी पण करून झाली पण शिवराय फक्त फोटोतच राहिले पण शिवराय फक्त मुर्तीतच राहिले दंग्यासाठी जमले सारे दंग संपला परत गेले “ जय शिवबा आणि जय जिजाऊ ” ओठातच नुसते विरून गेले ओठांवरचे शिवराय डोक्यात कधी जाणार, डोक्यातले शिवराय मनात कधी जाणार, मनातले शिवराय आचरणात कधी येणार, याची वाट शिवराय पण पाहत असतील, हनुवटीवर हात ठेवून विचार करत बसले असतील. ओठातले शिवराय डोक्यात जेव्हा जातील, रायगडावरच्या दगडांची सुदधा फुले होऊन जातील. डोक्यातले शिवराय मनात जेव्हा जातील, तेव्हा समस्त गड-किल्ल्यांना जाग येईल. मनातले शिवराय आचरणात जेव्हा येतील, तेव्हा माझे शिवराय पुन्हा जन्म घेतील...... तेव्हा माझे शिवराय पुन्हा जन्म घेतील.....

Feelings expressed....

When you are feeling alone like no one cares, read this because its absolutely true..... Every night,someone thinks about you before they go to sleep. At least fifteen people in this world love. The one and only reason someone would ever hate you is because they want to be just like you. There are at least two people in this world that would die for you. You meant the world to someone. someone that you don't even know exists loves you. When you make the biggest mistake ever, something good comes from it. When you think the world has turned its back on you, take a look. Always remember the compliments you've received and forget the rude remarks...
पाऊस... पाऊस म्हणजे पाणी... पाऊस म्हणजे गाणी... पाऊस म्हणजे वारा... थंड थंड गारा.... हिरव्यागार मखमालीवर थेंबांचा मारा... पाऊस म्हणजे हिरवळ... पाऊस म्हणजे ओलसर... पाऊस म्हणजे काळ्या काळ्या ढगांची गर्दी ती वेडसर.... पाऊस कायम हवा-हवासा... कधी रिमझिम, कधी रिपरिप... पाऊस कधीतरी नकोसा... प्रेमाची गीते पाऊस... म्हातार्यांचा अनुभवी पाऊस... कोणाचीतरी भिजण्याची हौस... पाऊस एकदम निराळा...                               - शार्दूल नरेंद्र मंदृपकर...

Social Media