Skip to main content

Posts

रविवारच Subscription

    आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या. "अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?...

The night and its magic

The night and its magic, no one awake and nothing tragic! Beneath the velveteen cloak of night, the world is quite and enveloped in glow of moonlight! No footsteps near and no voices around, just the twinkle of stars sky bound! In the night shadows, all secrets are kept, as the world peacefully slept! The night, a paper for dreams to unfurl, where magic happens, in each twirl! Through the silence, the soul takes flight, in the arms of wonderful night. No sorrows, no worries on the way, just the calm mind with the end of day!

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

शुभ्या

 पू ल म्हणतात की, " काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की त्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो " ह्याच काही लोकांच्यात तुझी गणना होते.  " बास की बंगलोर आता या पुण्यात" तू म्हणून म्हणून दमलास पण अजूनही ते जमलं नाही. अजूनही वाटत call करावा आणि पोटभरून शिव्या द्याव्यात तुला.  call केल्यावर कायम " काय साहेब कुठ हाय, काय कुठ पत्ता" अस तू विचारणार आणि मी कायम "हाय की इथच तुम्ही कुठाय पुणे का इस्लामपूर" अस म्हणून वाक्य तोडणार. शाळेत असल्यापासून तुझी मापं काढल्याशिवाय दिवस गेला नाही. तू आणि तुझ logic कायम next level. International tourism and Hospitality Management असा काहीतरी मोठ्या नावाचा course करायला गेलास आणि सुट्टीला samsung चा tab नाचवत यायचास. एकदा असाच मुंबई ला होतास आणि आपल्या "तात्या विंचू fan club" वरती मेसेज टाकलास "मला कसतरी होतंय" ह्या मेसेज वर सगळ्यांनी मिळून काय मापं काढली तुझी... २ दिवसांनी कळलं की तुला admit केलय आणि पांढऱ्या की लाल कोणत्यातरी पेशी कमी झाल्यात. तेव्हा जस गोसवीच्यात admit झालेलास आणि तिथून बर...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️ खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं, मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली, Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला, त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ. माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता. बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.  अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा. दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता) प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली"  (विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान!  नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय. मग विवेक काकाकडून ऐ...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

Social Media